IMD weather forecast October 9 heavy rain alert 22 states
esakal
IMD Weather Forecast October 9 : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असतानाच देशातील अनेक भागांमध्ये हवामानाने अचानक वळण घेतले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ९ ऑक्टोबरसाठी देशातील २२ राज्यांना पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. काही भागांत मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ७० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.