

IAS Anurag Yadav Clashes with Chief Election Commissioner Gyanesh Kumar: Who Is He?
esakal
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी उत्तर प्रदेशातील वरिष्ठ आयएएस अधिकारी अनुराग यादव यांचा तीव्र वादंग झाला. या घटनेमुळे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा निर्माण झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आभासी बैठकीत प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांच्या क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या विचारण्यात येत होती. यावेळी अनुराग यादव यांची पाळी आली तेव्हा त्यांनी उत्तर देण्यात काही वेळ विलंब केला. यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी एक टिप्पणी व्यक्त केली. त्यानंतर अनुराग यादव यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे बोलू शकत नाही.”