

CA Foundation AIR 1
esakal
CA Foundation All India Rank 1: नाशिकची साक्षी जैन हिने देशात अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या 'सीए फाउंडेशन मे २०२६' परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. साक्षीने ४०० पैकी तब्बल ३७१ गुण (९२.७५%) मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. नाशिकच्या शैक्षणिक इतिहासात सीए परीक्षेत एखादा विद्यार्थी देशात अव्वल येण्याची ही पहिलीच ऐतिहासिक वेळ आहे. साक्षीच्या या यशाची माहिती मिळताच तिच्या घरातल्यांना आनंदाश्रू दाटून आले आणि पालकांनी कपाळावर यशाचा गुलाल लावत आपल्या लाडक्या लेकीचे कौतुक केले.