

दिल्ली : इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने (Indira Gandhi National Open University, IGNOU) ज्योतिष शास्त्रामध्ये मास्टर्स प्रोग्राम (Masters Programme In Astrology) कोर्स सुरू केला आहे. इग्नूने या संदर्भात नुकतीच अधिकृत अधिसूचना देखील जाहीर केलीय. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ज्योतिषशास्त्रातील विविध शाखांविषयी व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने हा प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून विषयांत पदवीधर पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी या कोर्ससाठी अर्ज करू शकतात. या कोर्सचा कालावधी दोन वर्षांचा असून शिक्षणाचे माध्यम हिंदी असणार आहे. त्याचबरोबर, या प्रोग्रामबद्दल अधिक माहितीसाठी विद्यार्थी इग्नूच्या संकेतस्थळावर (ignouadmission.samarth.edu.in) जाऊन लॉग इन देखील करू शकतात. (IGNOU Launches Masters Course In Astrology Know Which Students Can Get Admission2021)
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने ज्योतिष शास्त्रामध्ये मास्टर्स प्रोग्राम कोर्स सुरू केला आहे.
दोन हप्त्यांमध्ये भरता येणार फी..
IGNOU ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, MAJY कार्यक्रमासाठी एकूण फी 12,600 रुपये असून ही फी दोन हप्त्यांमध्ये देखील भरता येऊ शकते. त्याअंतर्गत पहिल्या वर्षासाठी नोंदणी फी 6,300 तर दुसर्या वर्षासाठी 6,300 रुपये असणार आहे. हा कार्यक्रम देशभरातील वेगवेगळ्या राज्यात 57 इग्नू क्षेत्रीय केंद्रांवर प्रसारित होणार आहे. त्याशिवाय अलीकडेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जुलैच्या सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश घेण्याची अंतिम तारीख वाढविलीय. यानुसार आता इग्नूच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे, असे उमेदवार 15 जुलै 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना इग्नूच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ignouadmission.samarth.edu.in अर्ज करू शकतात. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे. मात्र, परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना इग्नूच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
IGNOU Launches Masters Course In Astrology Know Which Students Can Get Admission 2021
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.