करिअर वेध : संघभावना

करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी संघभावना, टीमवर्क आणि ‘टीम प्लेअर’ असण्याचे महत्त्व; कुटुंबापासून कॉर्पोरेट, राजकारण, करमणूक व क्रीडा क्षेत्रापर्यंत सर्वच ठिकाणी एकत्रित प्रयत्नांची गरज
एकत्रित प्रयत्न: वैयक्तिक यशापेक्षा टीमच्या उद्दिष्टाला प्राधान्य.

एकत्रित प्रयत्न: वैयक्तिक यशापेक्षा टीमच्या उद्दिष्टाला प्राधान्य.

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ‘संघ भावना’ महत्त्वाची आहे. टीम वर्क करण्यासाठी आधी तुम्हाला ‘टीम प्लेअर’ असावे लागते. एखादी व्यक्ती टीम प्लेअर आहे याचा अर्थ ती व्यक्ती त्या टीममधल्या सर्वांना बरोबर घेऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करते. समाजात, राजकारणात, कॉर्पोरेट, खेळ (कोणताही), नाटक, सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुम्ही ‘टीम प्लेअर’ असणे अत्यावश्यक आहे.

खरं तर टीम वर्क सिद्ध करण्याची पहिली उत्तम जागा म्हणजे आपले कुटुंब. तुम्हाला घरात रोज किमान २५ वेळा तरी त्याची संधी मिळत असते, जो खरा टीम प्लेअर आहे तो त्याचे सोनं करतो, जो टीम प्लेअर नाही, तो ती संधी गमावतो. वर वर पाहता टीम वर्क, टीम प्लेअर या संज्ञा सोप्या वाटल्या तरी प्रत्यक्षात अमलात आणायला अवघड आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com