UPSC Exam Dates 2024
UPSC Exam Dates 2024esakal

UPSC Exam Dates 2024 : यूपीएससी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला असणार पूर्व परीक्षा

यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in विविध परीक्षांची तारीख चेक करू शकतात
Published on

UPSC Exam Dates 2024 : यूपीएससी अंतर्गत निवड होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा २०२४ आणि आयएफएस परीक्षा २६ मे २०२४ रोजी असेल. यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in विविध परीक्षांची तारीख चेक करू शकतात.

परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च असणार आहे. सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०२४ मध्ये असेल. यूपीएससीने परीक्षेसाठी १३ जानेवारी, २४ फेब्रुवारी, ९ मार्च, ६ जुलै, १० ऑगस्ट, १९ ऑक्टोबर, २१ नोव्हेंबर या तारखा राखीव ठेवल्या आहेत. एखादी परीक्षा रद्द झाल्यास या राखीव तारखांमध्ये परीक्षा घेतली जाईल.

UPSC Exam Dates 2024
UPSC Recruitment 2023 : लोक सेवा आयोग UPSC अंतर्गत एवढ्या पदांवर भरती, लगेच असा करा अर्ज

एनडीए आणि सीडीए परीक्षा २१ एप्रिलला

इंडियन इंजीनियरिंग सर्व्हिसेस (पीटी) २०२४ परीक्षा १८ फेब्रुवारीला तर संयुक्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा १८ फेब्रुवारीला असेल.

यूपीएससी सीएसई प्रीलिम्स आणि एनडीए, सीडीएस व्यतिरिक्त अन्य परीक्षांचे वेळापत्रकसुद्धा वेबसाइटवर जारी करण्यात आले आहे. इंजीनियरिंग सर्व्हिसेस साठीची पहिली परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी असेल.

तर सीआयएसएफ एसी (EXE) एलडीसीई २०२४ चे आयोजन १० मार्च २०२४ ला आणि आयएएस, आयएफएस परीक्षा २१ जून २०२४ ला असेल. अधिक माहितीसाठी तुम्ही यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com