Akola Assembly Election : राजकीय पक्षांच्या उमेदवार घोषणेकडे लक्ष,मूर्तिजापूर मतदारसंघात इच्छुकांनी ठेवले देव पाण्यात
Akola Vidhan sabha election 2024 : मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज आहे, पण उमेदवारांची घोषणा केव्हा होईल याकडे लक्ष लागले आहे. तीन प्रमुख पक्षांमध्ये चुरस असल्याने या निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे.
मूर्तिजापूर : विधानसभेसाठी ता. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या उमेदवारांची घोषणा केंव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.