Recipe: वजन कंट्राेलमध्ये ठेवायंच? नाश्त्यात खा पौष्टीक अन् टेस्टी नाचणीचा उपमा

पौष्टीक अन् टेस्टी अशी हटके रेसिपी ट्राय करा
recipe
recipesakal

रोजच्या कसरतीच्या दिनचर्येत सकाळी सकाळी नाश्त्याला काय करावं, हा खूप मोठा प्रश्न असतो. रोज काहीतरी नवीन करणे शक्य होत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. नाचणीचा उपमा. ही एक स्वादीष्ट आणि पौष्टीक अशी डिश आहे. चला तर जाणून घेऊया नाचणीचा उपमा कसा करायचा?

recipe
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने चंपाकळी कशी तयार करायची?

साहित्य -

  • नाचणी

  • मेथी

  • मोड आलेले मूग

  • टोमॅटो

  • हिंग

  • मोहरी

  • जीरे

  • मीठ

  • मटर

  • तेल कढीपत्ता

  • किसलेले गाजर

  • हळद

  • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • आलं लसणाची पेस्ट

recipe
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या कशा तयार करायच्या?

कृती -

  • सुरवातीला नाचणीला भिजवावे आणि मोड आल्यानंतर वाफवून घ्यावे.

  • तेलात जीरे आणि मोहरी, मिरच्या कढीपत्ता, मटर तसेच आलं लसणाची पेस्ट घालून फोडणी द्यावी.

  • त्यानंतर त्यात गाजर आणि टोमॅटो आणि गाजराचा किस घालून चांगले परतून घ्यावे

  • त्यानंतर त्यात मूग आणि मेथी घालावी आणि थोडं शिजू द्यावं.

  • वाफ आल्यावर त्यात नाचणी घालावी

  • त्यात मीठ आणि लिंबू पिळून टाकावे आणि गॅसवर मंद आचेवर शिजू द्यावे

  • तुमचा उपमा तयार होणार. त्यावर तुम्ही कोथिंबीर, लिंबू, शेव घालून सर्व्ह करू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com