Denmark : डेन्मार्कच्या शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू

Denmark Crime News
Denmark Crime Newsesakal
Summary

डेन्मार्कमधील (Denmark) कोपनहेगन येथील एका मॉलमध्ये गोळीबार झालाय.

डेन्मार्कमधील (Denmark) कोपनहेगन येथील एका मॉलमध्ये गोळीबार झालाय. त्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एकाला अटक केली असून पुढील तपास सुरूय. किती लोक जखमी झाले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. परंतु, कोपनहेगनचे महापौर (Mayor of Copenhagen) हा हल्ला अत्यंत गंभीर मानत आहेत.

घटनास्थळावरून काही फोटोही समोर आले आहेत, यात लोक घाबरून इकडून-तिकडं धावताना दिसत आहेत. मॉलमध्ये गोळीबार सुरू होताच लोक बाहेर पळू लागले. ज्याला जिथं जागा मिळेल, तिथं जाऊन तो लपत होता. कोणी दुकानाचा आसरा घेतला, तर कुणी मोकळ्या रस्त्यांवर धावताना दिसला. गोळ्यांचा खूप मोठा आवाज येत असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. त्यानुसार तीन ते चार गोळ्या झाडण्यात आल्या.

Denmark Crime News
Gujarat : गोध्रा हत्याकांडातील आरोपीला 20 वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा

गोळीबारानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. लोकांनी या परिसरात फिरू नये, असं आवाहन करण्यात आलंय. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिलीय. या संपूर्ण घटनेबाबत महापौर सोफी हेस्टोर्प अँडरसन म्हणतात की, किती लोक जखमी झाले आहेत किंवा किती जणांचा मृत्यू झालाय हे अद्याप कळू शकलेलं नाही. परंतु, हा हल्ला चिंताजनक आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

Denmark Crime News
नेता असावा तर असा! रस्त्यात ताफा थांबवून अपघातग्रस्ताला राहुल गांधींनी केली मदत

दरम्यान, जखमींना उपचारासाठी कोपनहेगन येथील रिग्शोस्पिटलेट (Rigshospitalet) या प्रमुख रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहितीही समोर आलीय. सध्या रुग्णालयात तीनहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, थोड्याच वेळात हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळं रुग्णालयातील परिचारिका आणि शल्यचिकित्सकांची संख्या वाढवण्यात आलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com