Pakistan Politics: पाकिस्तानचे तुकडे करण्याची तयारी? लष्करप्रमुखांच्या प्रस्तावावरून नवा वाद

Pakistan Restructuring may be divided into smaller provinces: पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर देशाची प्रशासकीय रचना बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानातील चार मोठ्या प्रांतांचे विभाजन करून त्यांच्या जागी १२ ते १५ लहान प्रांत निर्माण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या बदलामुळे पाकिस्तानचा राजकीय नकाशा बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Pakistan Restructuring

Pakistan Restructuring

sakal

Updated on: 

Islamabad: भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तान बद्दलची मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील आकाराने मोठ्या असलेल्या चार प्रांतांचे तुकडे केले जाणार असल्याचे समजते. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास पाकिस्तानच्या नकाशात मोठ्या प्रमाणात बदलणार होणार असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाच्या मागे पाकिस्तानचे लष्कर असल्याचेही सांगण्यात आले.

Loading content, please wait...