जीवनमान-जीवनभान : कर्करोग आणि पुनर्वसन

Cancer Rehabilitation: Rebuilding Strength, Confidence and Quality of Life : कर्करोगावरील उपचारांनंतर रुग्णांना थकवा, अशक्तपणा आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. फिजिओथेरपी, योग्य आहार आणि समुपदेशनातून पुनर्वसनामुळे स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होते.
Cancer Rehabilitation: Rebuilding Strength, Confidence and Quality of Life

Cancer Rehabilitation: Rebuilding Strength, Confidence and Quality of Life

esaka

Updated on: 

डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी) प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

कॅन्सर किंवा कर्करोगाचे निदान झाले, की सगळ्यांचेच धाबे दणाणतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत कर्करोगातून सहीसलामत बाहेर पडणे क्वचितच दिसून येत असे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान, अद्ययावत शस्त्रक्रिया आणि सुधारित औषधोपचारांमुळे आज कर्करोगावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पण उपचारांदरम्यान आणि त्यानंतरही अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कर्करोगातून वाचलेल्या व्यक्तीचे जीवन पुन्हा स्वावलंबी, कार्यक्षम आणि आनंदी करण्यासाठी पुनर्वसनाची (Cancer Rehabilitation) गरज असते.

मुळात कर्करोग म्हणजे शरीरातील काही पेशींची अनियंत्रित वाढ होणे. या असामान्य पेशी संबंधित अवयवाच्या कार्यात अडथळा निर्माण करतात. प्रगत अवस्थांमध्ये त्या रक्तप्रवाहातून किंवा लसिकावाहिन्यांमधून शरीरातील इतर अवयवांमध्ये पसरतात. याला मेटास्टॅसिस म्हणतात.

Loading content, please wait...