Cancer Drug Price Cut: कॅन्सरच्या महागड्या औषधांबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमचा खर्च किती वाचणार? आता मिळू शकतो मोठा दिलासा!

Government Plans 30% Trade Margin Cap on 110 Cancer Drugs : केंद्र सरकारचा ११० कर्करोगाच्या औषधांवरील व्यापार नफ्याला ३० टक्के मर्यादा घालण्याचा निर्णय; औषधांच्या किमती ७० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता.
Cancer medicines in India could become more affordable as the government plans to cap trade margins at 30% for 110 non-scheduled cancer drugs, potentially reducing maximum retail prices by up to 70% in some cases

esakal

Updated on: 

कर्करोगाच्या उपचारांसाठी महागडी औषधे खरेदी करणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कर्करोगावरील ११० औषधांच्या व्यापार नफ्यावर ३० टक्क्यांची मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ३५ पेटंट असलेल्या औषधांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे काही औषधांच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही व्यवस्था सुमारे १० दिवसांत लागू होण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com