

Brain Tumor Early Symptoms No One Should Ignore
sakal
आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी चक्कर येणे, एखादी गोष्ट विसरणे किंवा चालताना अचानक तोल जाऊन एखाद्या वस्तूला धडक लागणे असे अनुभव येत असतात. बहुतेक वेळा या गोष्टींचे कारण ताणतणाव, थकवा, अपुरी झोप किंवा निष्काळजीपणा असे मानले जाते. मात्र, ही लक्षणे वारंवार दिसू लागली किंवा कालांतराने ती अधिक गंभीर होत गेली, तर ती मेंदूतील ट्युमरसारख्या गंभीर आजाराची संकेत असू शकतात.