

Eye Burning & Itching: Wash with Water or Use Eye Drops?
esakal
Eye Care Tips: वाढते प्रदूषण आणि वेगाने बदलणाऱ्या हवामानामुळे सध्या अनेक जण डोळ्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत. हवेतील धूर, धूळ आणि वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांत तीव्र जळजळ होणे, लालसरपणा येणे आणि सतत खाज सुटणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत अनेक लोक लगेचच डोळ्यांवर पाण्याचे हबके मारून डोळे धुतात, तर काही जण थेट बाजारातून आय ड्रॉप आणून डोळ्यांत घालतात. पण, या दोन्हीपैकी नेमकी कोणती पद्धत योग्य आहे? याविषयी नेत्रतज्ज्ञांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांत जळजळ झाल्यावर पाण्याचे हबके मारावेत की आय ड्रॉप वापरावा, हे जळजळ होण्यामागच्या मूळ कारणावर अवलंबून असते.