

Google Before Doctors? 60% of Indians Rely on Online Health Information, AI for Quick Answers
esakal
AI in Healthcare: डोकेदुखी असो, ताप असो किंवा एखाद्या आजाराची लक्षणे... पूर्वी अशा वेळी थेट डॉक्टरांकडे धाव घेणारे अनेक जण आता आधी इंटरनेटवर माहिती शोधताना दिसतात. विशेष म्हणजे, या ऑनलाइन माहितीवर भारतीयांचा विश्वासही वाढत आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या (BCG) नव्या अहवालानुसार, भारतातील 60% नागरिक ऑनलाइन उपलब्ध आरोग्यविषयक माहिती विश्वासार्ह मानतात. हे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा तब्बल 19 टक्के अधिक आहे.