

Neuro Monitoring in Spine Surgery: Role, Benefits and Limitations
ESAKAL
डॉ. अजय कोठारी ,स्पाइन सर्जन
‘‘डॉक्टर, ऑपरेशनच्या वेळी नसांना काही त्रास झाला तर तुम्हाला ते लगेच कळतं का?’’ स्पाइन सर्जरीबद्दल बोलताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात हा प्रश्न असतोच. कारण कण्याच्या अगदी जवळून शरीराच्या महत्त्वाच्या नसा जातात. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना हाडं, डिस्क किंवा इतर रचना हाताळताना नसांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. याच ठिकाणी न्युरोमॉनिटरिंग ही आधुनिक सुविधा उपयोगी ठरू शकते.