

Aging and Spine Health: 6 Simple Habits to Keep Your Back Strong and Pain-Free
esakal
Aging and Spine Health: वाढत्या वयासोबत मानवी शरीरात अनेक बदल घडून येतात. यामध्ये मणक्यामधील (Spine) डिस्क डिहायड्रेशन, स्नायूंची ताकद कमी होणे, पाठीचा कडकपणा आणि चुकीची बसण्याची पद्धत यामुळे कण्याचे आरोग्य हळूहळू ढासळू लागते. पण, वाढत्या वयासोबत पाठीचे किंवा मानेचे सतत दुखणे सहन करणे अजिबात गरजेचे नाही, असे मत प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन व्यक्त करतात.
योग्य वेळ, योग्य दिनचर्या आणि शरीराचे वजन नियंत्रणात ठेवून कण्यावर पडणारा अतिरिक्त ताण सहज टाळता येऊ शकतो. मणका मजबूत ठेवण्यासाठी आणि त्याचे आरोग्य जपण्यासाठी डॉक्टर ६ महत्त्वाचे उपाय सांगतात.