

World Thyroid Day 2026
sakal
World Thyroid Day 2026, Types, Symptoms, Treatments: दरवर्षी 25 मे रोजी जागतिक थायरॉईड दिवस साजरा केला जातो. शरीरातील एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे थायरॉईड ग्रंथी. प्रामुख्याने महिलांना होणारा हा आजार बऱ्याचदा शरीरासोबतच मनावरही परिणाम करतो. अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे, बदलते मूड स्विंग्स ही लक्षणं सहसा दुर्लक्षित केली जातात. मात्र हीच लक्षणे थायरॉईडच्या समस्येची सुरुवात असू शकतात.
वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास बहुतेक थायरॉईड विकार नियंत्रणात ठेवता येतात आणि रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात. आणि म्हणनूच जागतिक थायरॉईड दिवसाचं महत्त्व वाढतं.