

Jalgaon News : निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता. १५) महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून, या तारखेपासून निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यामुळे या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. (Strictly Follow Model Code of Conduct Collector Prasad)