

Dapoli Nuclear Project
ESakal
दापोली : विकासाच्या नावाखाली कोकणच्या निसर्गसंपदेवर आणि स्थानिकांच्या भवितव्यावर कोणताही घाला येऊ नये यासाठी भिवबंदर–आघारी येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी एकजुटीची भूमिका घेतली आहे. या प्रकल्पाचे संभाव्य दुष्परिणाम, पर्यावरणावरील परिणाम आणि स्थानिकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी वणौशी येथे आयोजित सभेत ग्रामस्थांनी एकत्रितपणे आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.