

Livestock ear tagging in Pali, Raigad district, as the Animal Husbandry Department urges farmers to complete tagging to access government schemes.
esakal
पाली: (वार्ताहर) दुष्काळी परिस्थितीत चारा अनुदान, छावण्या व विम्यासाठी जनावरांच्या कानातील टॅग आवश्यक आहे. मात्र अनेक जनावरांना टॅग नसल्याने ग्रामीण भागातील हजारो पशुपालक अडचणीत येऊ शकतात. तांत्रिक अडचणी व जनजागृतीच्या अभावामुळे अद्याप बहुतांश जनावरांचे टॅगिंग झालेले नाही. अशा वेळी केवळ टॅग नसल्याच्या तांत्रिक कारणावरून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्यास त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात येईल, अशी माहिती भाजप किसान मोर्चाने दिली आहे. गुरांना टॅगिंग करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.