हौसेने घेतली रिक्षा, चालवली 10 दिवस तवर.....

lockdown impact on new auto purchase
lockdown impact on new auto purchase

रत्नागिरी : लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे गेले दोन महिने  रिक्षा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, रिक्षाचं कर्ज कसं फेडायचं अशी अनेक आव्हानं या रिक्षा व्यवसायिकांसमोर आहेत. रत्नागिरी शहरातील प्रमोद वायंगणकर हे अशांपैकी एक रिक्षा व्यवसायिक आहेत. कधी एकदा रिक्षा सुरु होतेय आणि आपली आर्थिक घडी पुन्हा बसेल या प्रतीक्षेत ते आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लाॅकडाऊनमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यापैकीच एक रिक्षा व्यवसाय. या रिक्षा व्यवसायावर हजारो जणांचं पोट अवलंबून आहे. रोजच्या कमाईवरच कुटुंबाचा गाढा अनेक रिक्षा व्यावसायिक हाकत असतात. काहींनी तर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी नवीन रिक्षा खरेदी केल्या.
रत्नागिरीतील व्यवसायिक वायंगणकर गेली अनेक वर्षे रिक्षा व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात.

वायंगणकर यांचं 4 जणांचं कुटुंब. त्यांचा एक मुलगा इंजिनिअरिंग करतोय, तर दुसरा आठवीला आहे. रिक्षा व्यवसायावरच मुलांचं शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मार्च महिन्यात प्रमोद वायंगणकर यांनी नवीन रिक्षा घेतली. दोन लाखांचं कर्ज काढून त्यांनी नवीन रिक्षा घेतली. त्यानंतर नवीन रिक्षावर जेमतेम 10 दिवस व्यवसाय केला. आणि त्यानंतर सुरू झालं लॉकडाऊन. आज दोन महिने उलटून गेलेत, लाॅकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे प्रमोद वायंगणकरांच्या सर्वच स्वप्नांवर पाणी फिरलं आहे. कर्जाचा दर महिन्याचा हप्ता पाच हजार रुपये, पण व्यवसायच ठप्प. त्यामुळे एकही हप्ता अद्याप फेडलेला नाही.

हाताशी असलेला पैसाही संपला आहे. त्यामुळे कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यांच्याप्रमाणे अनेक रिक्षा व्यवसायीक रिक्षा व्यवसाय कधी सुरु होणार याकडे डोळे लावून बसलेत. एकूणच रिक्षा व्यावसायिक सध्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात हजारो रिक्षा फिरत आहेत. पूर्वी सारखी स्थिती नाही. रिक्षा वाढल्या आणि दिवसाची कमाई पण कमी झाली. त्यात हे कोरोनाचे संकट. होते नव्हते तेवढे पुंजी संपत चाललीय. तिकडे नियम अटी घालून टॅक्सी, कॅब सुरु केली गेली. तसंच नियम ठेवून रिक्षा सुरु झाली तर आमचे कुटुंब चालेल,  अन्यथा आमची अवस्था बिकट होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com