Rajapur historical Modi documents
esakal
राजापूर : तालुक्यातील ओझरगावच्या अठराव्या शतकातील इतिहासाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवजी पुरावे समोर आले आहेत. मोडीलिपीतील दोन जुन्या कागदपत्रांमधून वतनाचा वारसा, दत्तकपुत्राचा प्रश्न, खोती-पाटीलकीचे हक्क, जमिनीचे व्यवहार, कर्ज आणि वतनवाटपावरून झालेल्या संघर्षाची माहिती उघड झाली आहे. या दस्तऐवजांमुळे सुमारे अडिचशे वर्षांपूर्वीच्या राजापूर परिसरातील सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचा वेध घेता येणार (1789 Modi script historical records Maharashtra) आहे.