

Celebrating Humanity: Blood Donation Drive Hosted at New Panvel Mosque
Sakal
पाली : 'त्याग आणि समर्पण' या मूल्यांचा संदेश देणाऱ्या ईदूज्-झुहा (बकरी ईद) चे औचित्य साधून नवीन पनवेल येथे सामाजिक सलोखा आणि मानवतेचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखा आणि विविध समविचारी संघटनांच्या वतीने रविवारी (ता. २४) एका विशेष रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.