बसवेश्‍वरांमुळे समाजाला वेगळी ओळख

बसवेश्‍वरांमुळे समाजाला वेगळी ओळख

Published on

97876
कणकवली : येथील तहसील कार्यालयात उपजिल्‍हाधिकारी मच्छींद्र सुकटे, तहसीलदार रमेश पवार, मल्लिकार्जुन माळगी आदींच्या उपस्थितीत श्रीबसवेश्‍वर जयंतीचा कार्यक्रम झाला.


बसवेश्‍वरांमुळे समाजाला वेगळी ओळख

उपजिल्हाधिकारी सुकटे; कणकवली तहसील कार्यालयात जयंती

कणकवली, ता.२२ : महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे उपजिल्हाधिकारी मच्छींद सुकटे यांनी केले.
तहसीलदार कार्यालयात आज बसवेश्‍वर जयंती कार्यक्रम झाला. यात श्री.सुकटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार रमेश पवार, पुरवठा विभागचे प्रभारी निरीक्षक अधिकारी आर. एम. कांबळे, डी. एम. पाटील, मेघनाथ पाटील, मंडळ अधिकारी प्रभूदेसाई, तसेच कर्मचारी वृंद, लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नागरिक मल्लिकार्जुन माळगी, निखिल घेवारी, अजित नष्टे, हरिष उचले, वृषभ मेनकुदळे, नेहा घेवारी, प्रियंका उचले आदी उपस्थित होते.
तहसीलदार रमेश पवार म्‍हणाले, तत्कालीन समाज अनिष्ट परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, जातीयता आदींनी त्रस्त, मरगळला होता. अशा परिस्थितीत त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी केले. दरम्‍यान, कणकवली नगरपंचायतीमध्येही बसवेश्‍वर जयंतीचा कार्यक्रम झाला. यात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते श्रीबसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com