बीडीओ विजय चव्हाण यांचा सत्कार

बीडीओ विजय चव्हाण यांचा सत्कार

99304
मुळदे ः मूळपुरुष देवघर वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बीडीओ विजय चव्हाण यांचा सत्कार करताना विश्राम मुळदेकर, सुजित जाधव. (छायाचित्र ः अजय सावंत)


बीडीओ विजय चव्हाण यांचा सत्कार

मुळदेवासीयांचा पुढाकार; मूळपुरुष देवघर वर्धापनदिनी सोहळा


कुडाळ, ता. २९ ः मुळदे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या कुडाळ पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचा सत्कार श्री गणेश स्वयंसहाय्यता महिला गट, श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला समूह व ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. हा सत्कार सोहळा मंडळाचे उपाध्यक्ष विश्राम मुळदेकर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
श्री गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मुळदे-चव्हाणवाडीतर्फे मूळपुरुष देवघर वर्धापन दिनानिमित्त संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‍घाटन चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या हस्ते बीडीओ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी चर्मकार समाजाचे पदाधिकारी के. टी. चव्हाण, मनोहर सरमळकर, राजन वालावलकर, सौ. जाधव, मुळदे सरपंच संध्या मुळदेकर, उपसरपंच अपूर्वा पालव, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव, योगिता माळकर, अश्विनी पालव, वैशाली पालव, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी पालव, माजी सरपंच गुरुनाथ चव्हाण, संजय पालव, माजी उपसरपंच अमित पालव, लक्ष्मण पालव, ग्रामसेवक तोरसकर, नागेश जाधव, गुंडू जाधव, श्री. धुरी, पोलिस पाटील रामदास चव्हाण, श्री गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मुळदे - चव्हाणवाडीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष विश्राम मुळदेकर, सचिव सोमा मुळदेकर, श्री गणेश स्वयंसहाय्यता महिला गट, श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला समुहाचे पदाधिकारी उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात मुळदेच्या विकासाबरोबरच दलित वस्ती सुधारणाअंतर्गत योजना आणण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिलेले बीडीओ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी मुळदे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्याबरोबरच तालुक्यातील विविध लवकरच मार्गी लागतील, अशी ग्वाही दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com