रत्नागिरी ःभाट्ये दर्गास्टॉप येथे मोटारीची दुचाकीला धडक

रत्नागिरी ःभाट्ये दर्गास्टॉप येथे मोटारीची दुचाकीला धडक

-rat15p25.jpg
83872
रत्नागिरी ः शहराजवळील भाट्ये दर्गास्टॉप येथील अपघातग्रस्त दुचाकी व मोटार.


भाट्ये दर्गास्टॉप येथे
मोटारीची दुचाकीला धडक

स्वार गंभीर जखमी; दोन्ही वाहनांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः शहरानजीकच्या भाट्ये दर्गा स्टॉप येथे मोटार आणि दुचाकीत अपघात झाला. मोटारीने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
केतन शशिकांत साळवी (वय ३६, रा. फणसोप टाकळेवाडी, रत्नागिरी) असे गंभीर जखमी झालेल्या स्वाराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता १५) दुपारी अडीचच्या सुमारास भाट्ये दर्गा स्टॉप येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी केतन दुचाकी (एमएच ०८, एव्ही ७८७७) घेऊन रत्नागिरीहून फणसोपला आपल्या घरी जात होता. त्याच सुमारास राहुल अण्णासाहेब पतनकुट्टे (वय २५, रा. सन्मित्रनगर, रत्नागिरी) हा मोटार (एमएच ०८, सी ५४२५) घेऊन पावस ते रत्नागिरी असा येत होता. ही दोन्ही वाहने भाट्ये दर्गा स्टॉप येथे आली असता राहुलचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्‍या केतन साळवीच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, त्यात दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला व मोटार रस्त्याच्या २५ ते ३० फूट खाली जाऊन झाडीत अडकली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात गंभीर जखमी केतन साळवी याच्या डोक्याला, दोन्ही हातांना, पायांना गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीने गंभीर जखमी केतनला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com