नवनिर्माण महाविद्यालयाचा निकाल ९५.३५ टक्के

नवनिर्माण महाविद्यालयाचा निकाल ९५.३५ टक्के
Published on

३० (पान ५ साठी)

‘नवनिर्माण’चा निकाल ९५.३५ टक्के

रत्नागिरी, ता. २१ ः येथील नवनिर्माण कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल ९५.३४ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १९६ विद्यार्थ्यांपैकी १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये कला शाखेचा निकाल ९५.३४ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९८.११ टक्के, तर विज्ञान शाखेचा निकाल ९२ टक्के लागला. कला शाखेतून वैष्णवी सुनील बांडागळे (६९ टक्के), सृष्टी प्रकाश पाडावे (६६ टक्के), खुशी रामू चव्हाण (६१.६७ टक्के), वाणिज्य शाखेतून जय हरेश पटेल (७८ टक्के), निधी विनोद गावकर (७२.६८ टक्के), लुकमान खलील पटेल (६६.५० टक्के), तर विज्ञान शाखेतून स्वरूप प्रमोद रेंदाळकर (९२.८३ टक्के), सोहम सोनू पानगले (९०.६७ टक्के) आणि राहुल उमेश जोशी (८५.१७ टक्के) यांनी महाविद्यालयातून प्रथम तीन क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com