राजापुरातून भाजप लढणार, जिंकणार

राजापुरातून भाजप लढणार, जिंकणार

rat६p३५.jpg -
P२४M८८४५२
रवींद्र नागरेकर


राजापुरातून भाजप लढणार, जिंकणार

रवींद्र नागरेकर ः कार्यकर्त्यानी कसली कंबर

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजापूर विधानसभा मतदार संघात भाजपची ताकद वाढलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजापूर विधासभा मतदार संघातून विरोधी उमेदवारांना मताधिक्य मिळाले असले तरी, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप या मतदारसंघातून लढणार आणि जिंकणार असल्याचा दावा भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्ते आतापासून कामाला लागल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून केंद्रीय मंत्री राणे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना राजापूर विधानसभा मतदार संघातून भाजपचाच उमेदवार निवडणूक लढवेल व शंभर टक्के जिंकेल असा दावा केला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये विरोधी उमेदवाराला मिळालेले मताधिक्य तोडून दुप्पट मताधिक्याने भाजपाचा उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी होईल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विकासाच्या बाबतीत राजापूर मतदार संघ मागास राहिलेला आहे. गेली पंधरा वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्‍यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा कोणत्याही प्रश्नांना न्याय दिलेला नाही. बेरोजगारांच्या हाताला काम देईल असा कोणताही प्रकल्प आणलेला नाही. अशा निष्क्रिय नेतृत्वाला मतदार संघातील जनता कंटाळलेली आहे. जनतेला आता परिवर्तन हवे आहे. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून या मतदारसंघात शंभर टक्के परिवर्तन होणार असल्याचे नागरेकर यांनी सागितले.
----------------------
कार्यकर्त्यांचा उत्साहाला बळ
कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी काल (ता.५) पत्रकार परिषदेमध्ये राजापूर विधानसभा मतदार संघावर भाजप दावा करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजापुरातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साहाला अधिक बळ मिळाल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com