

19433
धर्मांतरण म्हणजे विचार परिवर्तन होणे
प्रा. डॉ. सोमनाथ कदम : हरकुळ बुद्रुक येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १७ : तथागत गौतम बुद्धांनी करुणा व समतेचा धम्म दिला. बुद्धानंतर सम्राट अशोक आणि त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील वंचित लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. धर्मांतरण म्हणजे विचार परिवर्तन होणे आहे. विचार परिवर्तन झाले तरच धम्म परिवर्तनाचा उद्देश यशस्वी होतो. समता व न्याय हा भारतातील धम्मक्रांतीचा मूलाधार होता, असे प्रतिपादन लेखक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले.
कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथे भारतीय बौद्ध सभेच्यावतीने अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रम झाला. यात डॉ. सोमनाथ कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा हरकुळ बुद्रूक अध्यक्ष विलास कदम होते.
श्री.कदम म्हणाले, "धर्मांतरानंतर येथील बहिष्कृत वर्गाच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या कायमच्या तुटल्या. स्वाभिमान आणि आत्मविश्वास आल्याने वंचित समूह प्रबुद्ध झाला. नशिबाने नव्हे तर शिक्षणाने उत्तम प्रगती गाठली . हक्काच्या समतावादी धम्माचे आचरण सुरू झाले आहे. आता आपल्याला मिळालेला नवीन प्रकाश, नवीन जीवन, नवीन विचार ,नवीन मूल्य अन्य शोषित वर्गामध्ये पेरण्याची जबाबदारी प्रबुद्ध वर्गाने पूर्ण करावी. प्रास्ताविक ॲड. संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय तांबे यांनी केले. तर आभार सतीश धामणकर यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.