महावाचन उत्सवात १५३७ विद्यार्थ्यांचा सहभाग

महावाचन उत्सवात १५३७ विद्यार्थ्यांचा सहभाग
Published on: 

- ratchl१७१.jpg
२४N१९४५५
- चिपळूण ः सती चिंचखरी विद्यालयातील वाचकवीर पुरस्कारप्राप्त विद्यार्थी.

महावाचन उत्सवात १५३७ विद्यार्थ्यांचा सहभाग

सती चिंचघरी महाविद्यालय ; पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः तालुक्यातील सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचकवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये आदिती शिंदे, अंकित गुप्ता यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला तसेच या निमित्त आयोजित महावाचन उत्सवात १ हजार ५३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सती विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त वाचकवीर पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले गेले. या प्रसंगी मुख्याध्यापक संजय वरेकर यांनी डॉ. कलाम यांचे शालेय शैक्षणिक जीवन ते मिसाईल मॅन व राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास सर्वांपुढे मांडला. वाचनाने माणूस समृद्ध बनतो. त्यामुळे वाचनाची आवड जोपासा, असे आवाहन त्यांनी केले तसेच तुकाराम पाटील म्हणाले, ग्रंथालय चळवळीत महावाचन उत्सव विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र वितरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे डॉ. अरविंद पोतदार यांनी ब्रँड अँबेसिडर अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देत वाचनाचे महत्व पटवून दिले.
विद्यालयातर्फे दिलेल्या वाचकवीर पुरस्कारात पाचवी ते सातवी गटात प्रांजल खरात, कोमल गुप्ता, नव्या सागवेकर, ईश्वरी सुर्वे, श्रेया कासार, स्वरा जाधव तर आठवी ते दहावी गटात स्नेहा खांबे, केतन पवार, समृद्धी चव्हाण, वैष्णवी शेडगे यांनी यश संपादन केले. महावाचन उत्सवातील व्हिडिओ निर्मिती व पुस्तक लेखनामध्ये ईश्वरी गाडीवड, विनित गजमल, शुभ्रा जंगम आणि सहावीतील माही कोटकर, शर्वरी मोडक, दीपा पवार, प्रसाद पवार, वंदना समुद्रे यांनी तर सातवी गटात चिरायू चाळके, आर्या सकपाळ, श्रुती मोहिते, मृणाल सुतार, मृण्मयी जोग यांनी यश मिळवले.
-----
भित्तिपत्रकाचे आयोजन

डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रकाचे आयोजन केले होते. त्याचे उद्‍घाटन सरपंच राजेंद्र चाळके व रमेश चाळके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्मिता चाळके, स्मृती जाधव, शर्मिला जाधव, सुनीता वारंग, माधवी राजेशिर्के, अमोल कोतवाल, धनंजय राजेशिर्के उपस्थित होते.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.