कट्टा येथे रविवारी जिल्हा खो-खो स्पर्धा

कट्टा येथे रविवारी जिल्हा खो-खो स्पर्धा
Published on: 

कट्टा येथे रविवारी
जिल्हा खो-खो स्पर्धा
मालवण : दी अमॅच्युअर खो-खो असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने १८ वर्षांखालील मुले व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा स्पर्धा रविवारी (ता. २०) कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत धाराशिव येथे होणाऱ्या ४३ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
या स्पर्धेसाठी वयोमर्यादा १८ वर्षांखालील असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्लब, शाळा, संस्था आदी सर्वांना प्रवेश मिळेल. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाने अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी सचिव संजय पेंडूरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सामंत यांनी केले आहे.

आकाश कंदील स्पर्धेचे
आचऱ्यात आयोजन
आचरा ः दिवाळीचा आनंद तेजोमय व्हावा आणि हरवत चाललेली कंदील बनविणे कलेला वाव मिळण्याकरिता सिरॉक ग्रुप आचरा व ''रंगभूमी गावातली'' यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आचरा, चिंदर, त्रिंबक, वायंगणी गावांसाठी मर्यादित आहे. स्पर्धकांनी ३० ऑक्टोबरपर्यंत कंदील तयार करून तो आपल्या घरानजीकचा रस्ता, पाणंद किंवा पायवाट या ठिकाणी किमान १० ते १५ फूट उंचीवर लावायचा आहे. परीक्षक स्पर्धकांनी दिलेल्या पत्त्यावर येऊन परीक्षण करतील. कंदिलाची लांबी, रुंदी, उंची कमीत कमी दोन फूट असावी. त्यामध्ये विद्युत दिवा (बल्ब) असणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये कुटुंब, फ्रेंड सर्कल, बचतगट, वाडी, मंडळ, महिला मंडळ आदी कोणीही सहभाग घेऊ शकतात. यासाठी प्रथम ४००१, द्वितीय ३००१, तृतीय २००१ रुपये व उत्तेजनार्थ प्रथम आणि उत्तेजनार्थ द्वितीय प्रत्येकी रुपये ५०० रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.