

अश्विनी मुरूडकर, नेहा जाधव यांचा
वाचकवीर पुरस्काराने सन्मान
सावर्डे : येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित सचित्र भित्तीपत्रक तयार करण्यात आली होती. या भित्तीपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाचे पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय तोडकर उपस्थित होते. विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या चार महिन्यांच्या कालावधीत ग्रंथालयातील सर्वात जास्त पुस्तकांचे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाचकवीर पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. त्यामध्ये लहान गटामध्ये अश्विनी मुरूडकर आणि मोठ्या गटामध्ये नेहा जाधव यांचा समावेश आहे.
राजकीय बॅनर हटवण्यास वेग
साखरपा : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना अर्थात आचारसंहिता लागताच गावाच्या हद्दीतील राजकीय बॅनर हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गावागावांतून ठिकठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय नेत्यांच्या जाहिरातींचे, वाढदिवसाचे बॅनर काढून टाकताना दिसत आहेत. शासकीय योजनांचेही बॅनर काढून टाकण्यास प्रारंभ झाला आहे; तसेच विविध विकासकामांच्या उद्घाटनांचे बॅनर काढले जात आहेत. ज्या विकासकामाचे फलक कायमस्वरूपी तयार करण्यात आले आहेत. त्यावर कागद चिकटवण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.