

सैनिक हेच खरे देशाचे हिरो
असायला हवेत ः चिथडे
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २२ : छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रकार्यातून स्फूर्ती घेऊन देशासाठी, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत उत्तुंग कार्य करणाऱ्या सुमेधा चिथडे यांचे राष्ट्रकार्यासाठी माझे योगदान या विषयावरील व्याख्यान झाले.
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात चिथडे यांनी शहीद स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यानंतर शहीद स्मारक स्थळ व परमवीर चक्र दालनाविषयीची माहिती जाणून घेतली. आपला वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे, विचारसरणी, वैयक्तिक अडचणी यांचा बाऊ न करता, अहोरात्र देशाच्या आणि देशवासीयांच्या रक्षणासाठी झटणारी सैन्यदले कधीही संपावर जात नाहीत. हे देशाचे खरे हिरो असायला हवेत, असे असे प्रतिपादन सुमेधाताईंनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी आपल्या प्रामाणिक व निस्पृह कार्यातून राष्ट्रसेवेचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या सुमेधाताईंचा आदर्श प्रत्येक नागरिकाने ठेवायला हवा, असे सांगितले.
---------
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.