

rat७p२३.jpg-
२५N३६९४४
रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा दर्पण पुरस्कार अनिकेत कोनकर यांना प्रदान करताना डॉ. सच्चिदानंद शेवडे. डावीकडून माधव हिर्लेकर आणि चंद्रकांत हळबे.
चुकीच्या पायंड्यांमुळे मराठीचे अस्तित्व धोक्यात
डॉ. सच्चिदानंद शेवडे ः शुद्ध मराठी वाचा अन् बोलासुद्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : जगात चिनी भाषा सर्वांत जास्त लोक बोलतात. इंग्रजीचा क्रमांक ३ लागतो. आता मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे. संस्कृतच्या गटात बसणारी ही भाषा असून बोलणाऱ्यांची संख्याही अधिक आहे; परंतु आपण पूर्ण मराठीत बोलत नाही. इंग्रजी शुद्ध मराठी बोलण्याकरिता वाचन व बोलणे याचे धडे गिरवले पाहिजेत. इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे आणि पाश्चिमात्य चुकीच्या पायंड्यांमुळे पाच-सहा पिढ्यानंतर मराठीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि केजीएन सरस्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती व्याख्यानमालेत शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. राणी लक्ष्मीबाई सभागृहात या व्याख्यानाला गर्दी झाली. डॉ. शेवडे म्हणाले, कोणत्याही सभा, संमेलनात मंचाला व्यासपीठ शब्द वापरला जातो. व्यासपीठ म्हणजे व्यासांचे पीठ म्हणजे तिथून प्रवचनकार प्रवचन देतात. हा चुकीचा शब्द वापरण्याऐवजी मंच शब्द वापरावा. मराठीला जरी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरीही मराठी माणसाने तिचा व्यवहारात उपयोग करताना तिचा गुणात्मक दर्जा टिकवला पाहिजे. योग्य जागी योग्य शब्द वापरावेत. त्यासाठी घरातूनच आपली भाषा जपली पाहिजे.
या प्रसंगी संघाचा दर्पण पुरस्कार डिजिटल माध्यमातील ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कोनकर यांना प्रदान करण्यात आला. मंचावर ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे उपस्थित होते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, राजेंद्रप्रसाद मसुरकर, प्रमोद कोनकर, उमेश आंबर्डेकर आणि मकरंद पटवर्धन यांना डॉ. शेवडे यांच्या हस्ते सन्मानित केले. संघाच्या सचिव शिल्पा पळसुलेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी आभार मानले.
-------
मराठी बोला
इंग्रजांनी भारतात गुलामीची चिन्हं ठेवली आहेत. त्यामुळे इंग्रजीकडे ओढा अधिक दिसतो. आपल्या मराठी मुलांना संतांच्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत. अमृताहूनी गोड नाव तुझे देवा, यातील गोडवा कळत नाही. कारण, घरातला परवचा बंद झाला. नकळत्या वयापासून शुभंकरोती, रामरक्षा व परवचा पाठ होतो; परंतु पालकांना वेळ कुठे असतो; मात्र टीव्हीवर सासू-सुनांच्या भांडणाच्या मालिका बघायला वेळ असतो. आपण जबाबदारीने वागलो, मराठी बोललो तरच मराठी जगणार आहे, असे मत डॉ. शेवडे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.