

swt79.jpg
36980
डॉ. गजानन कोटेवार
महाराष्ट्र ग्रंथालय संघ
अध्यक्षपदी डॉ. कोटेवार
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ७ः महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी डॉ. गजानन कोटेवार यांची पुन्हा निवड झाली आहे. ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूक शेगाव (जि. बुलढाणा) येथे रविवारी (ता. ५) पार पडली. राज्यभरातील १७० मतदारांपैकी १३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एक मत बाद झाले. यामध्ये डॉ. कोटेवार (वर्धा) यांना ८५ मते, तर गुलाबराव मगर यांना ४१ मते मिळाली.
कोकणमधील मंगेश मसके यांना ९ मते, उस्मानाबादमधील ग्रंथमित्र वसंत सूर्यवंशी हे मतदानास उपस्थित राहिले नाहीत. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. डॉ. गोपाल हेलोंढे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडून निकाल घोषित केला. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, कार्योपाध्यक्ष अनिल बोरगमवार, सचिव भाऊराव पत्रे यांनी निवडणुकीत मोठे सहकार्य केले. नागपूर जिल्हा ग्रंथालय संघांचे सचिव शामराव शामकुवर, उपाध्यक्ष प्रेमराज कुबडे व सर्व विभागांचे सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.