चिपळूण-होळीनंतर महामार्गावर वाहतूककोंडी

चिपळूण-होळीनंतर महामार्गावर वाहतूककोंडी
Published on

rat18p10.jpg
N51931
संगमेश्वरः शास्त्री पुलाजवळ झालेली वाहतूककोंडी.
---------------
होळीनंतर महामार्गावर वाहतूककोंडी
चाकरमानी परतीच्या वाटेवर; वाहतूक पोलिस हैराण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ः होळीसाठी कोकणात आपल्या घरी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी एकाचवेळी शेकडो वाहने आल्याने ठिकठिकाणी लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात त्रास होऊ नये म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना वाहतूक बंदी करण्यात आली होती; परंतु त्याचा काही फारसा परिणाम न झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील संगमेश्वर बाजारपेठेत सकाळपासूनच वाहतूककोंडी झाली होती. बहादूरशेख नाक्यावरही कोंडी झाली होती. ही कोंडी सोडवण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात केले होते.
होळी सणासोबत शनिवार व रविवार हे दोन दिवस सुट्टीचे असल्याने पुणे व अन्य शहरांतून पर्यटकही मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले होते. रविवारपासून त्यांनी आपला परतीचा प्रवास सुरू केला. पुढील पंधरा दिवस शिमगोत्सवाची धूम असणार आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी सकाळपासूनच होत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस व होमगार्ड ठिकठिकाणी प्रयत्न करत आहेत. संगमेश्वर बाजारपेठेजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी जुना रस्ता अरूंद आहे. संगमेश्वर बसस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या, देवरूखहून महामार्गावर येणारी वाहने एकाचवेळी एका ठिकाणी आल्यानंतर संगमेश्वर बसस्थानक परिसरात वाहतूककोंडी होते.
मागील दोन दिवस येथे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. या कोंडीचा फटका होळी सणावरून परत निघालेल्या चाकरमानी तसेच पर्यटकांना बसला आहे. बहादूरशेख नाका येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी कराडहून येणारी वाहने, चिपळूण शहरातील वाहने आणि महामार्गावरून प्रवास करणारी वाहने एकाच वेळी आल्याने वाहतूककोंडी होते.

कोट
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनाची संख्या वाढत असल्याने पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनाच्या रांगा लागत आहेत. महामार्गालगतची हॉटेलही गर्दीने फुलली आहेत. शिमगोत्स्वात काही दिवस चांगले उत्पन्न होईल, असा अंदाज आहे.
- आनंद जोशी, फूड कॉर्नर, असुर्डे, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com