सिंधुदुर्गात शुक्रवारपासून आरोग्य शिबिरे

सिंधुदुर्गात शुक्रवारपासून आरोग्य शिबिरे
Published on

सिंधुदुर्गात शुक्रवारपासून आरोग्य शिबिरे

‘कॅन्सर पेशंट एड्स’चा उपक्रम; कुणकेश्वर, दोडामार्ग, तुळसमध्ये आयोजन

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः सिंधुदुर्गात कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशनतर्फे २ ते ४ मे असे सलग तीन दिवस आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. यानिमित्त जिल्ह्यातील एक हजार गरजवंत आरोग्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. कुणकेश्वर, दोडामार्ग, तुळस येथे ही शिबिरे होणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१७ पासून दरवर्षी सातत्याने निरनिराळ्या ठिकाणी गरजवंत रुग्णांसाठी कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन आरोग्य शिबिरे आयोजित करत आलेली आहे. मुंबईत १९६९ मध्ये स्थापन झालेली ही संस्था आता हीरकमहोत्सवी वाटचाल करीत आहे. मुंबईतील महालक्ष्मी येथे मुख्यालय असलेली कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन कर्क रोगावर अत्यंत मूलभूत आणि व्यापक काम करत असलेली संस्था म्हणून प्रचलित आहे.
सिंधुदुर्गात २ मे रोजी कुणकेश्वर, ३ रोजी दोडामार्ग येथे तर ४ मे रोजी तुळस येथे शिबिरे आयोजित केली आहेत. त्यात जनरल सर्जन डॉ सतीश काणेकर, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. संजय घिल्डियाल, फिजिशियन डॉ. वीणा बोरकर व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रचना मेहरा सहभागी होणार आहेत. तसेच रुग्ण समुपदेशक म्हणून सीपीएएच्या कार्यकारी संचालिका नीता मोरे व सहसंचालिका मीनल परब सहभागी असणार आहेत. रुग्णांची तज्ज्ञांकडून तपासणी सोबत शिबिरात प्राथमिक रक्त तपास तसेच गर्भपिशवीच्या मुखाची पॅप स्मीयर तपासणी केली जाणार आहे. पुढील कुठल्याही स्वरुपाची आवश्यक रेडियोलॉजिकल तपासणी मुंबईत विनामूल्य तत्वावर केली जाणार आहे. ही शिबिरे कुणकेश्वर येथे कुणकेश्वर देवस्थान समिती, दोडामार्ग येथे नगराध्यक्ष चेतन चव्हाण तर तुळस येथे वेताळ प्रतिष्ठानच्या सहकार्याने व सहभागाने आयोजित केली आहेत. शिबिरांमध्ये रुग्ण तपासणीसाठी येणारा खर्च सिंधुदुर्गाशी नाळ असलेल्या डॉ. शुभा मौदगल आणि दीपा संघल यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ प्रदान केला आहे. या शिबिराच्या कार्यासाठी मुंबईतील शमीराज ट्रस्टने मोलाचा वाटा उचललेला आहे. सर्व शिबिरांना कणकवली येथील डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्या संजीवनी रुग्णालयाचे सहकार्य लाभणार आहे. गरजूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com