

मद्यपान करून रिक्षा चालवणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रसन्ना पंढरीनाथ पिलणकर (वय ३६, रा. मुरूगवाडा, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल कीर हे पेट्रोलिंग करत खारेघाट रोड रस्त्यावर आले. तेव्हा त्यांना संशयित प्रसन्ना पिलणकर हा मद्यपान करून निष्काळजीपणे रस्त्यावर रिक्षा (एमएच ८, बीसी ०४३६) चालवत असताना आढळला. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना मगदूम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
-------------
पेटवून घेतलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी ः कोंडओझरे (ता. संगमेश्वर) येथील वृद्धाने आजाराला कंटाळून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शांताराम गंगाराम नाचरे (वय ७५, रा. कोंड-ओझरे, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे. शांताराम नाचरे यांना शुक्रवारी (ता. ३०) रात्री जोराचा खोकला लागला. अचानक तब्येत बिघडली. नातेवाईक तातडीने रिक्षा सांगण्यासाठी गेले होते. त्याच कालावधीत त्यांनी घरातील रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेतले. त्यामध्ये ते ९० टक्के भाजले. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरूख येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी शुक्रवारी रात्री पावणेतीनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. शनिवारी (ता. ३१) सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
----------
झाडावरून पडून तरुण जखमी
रत्नागिरी ः खोरनिनको (ता. लांजा) येथे झाडावरून पडलेल्या तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओमकार किशोर सावंत (वय ३२, रा. खोरनिनको, ता. लांजा, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. ओमकार सावंत हा सकाळी घराच्या परिसरातील वाढलेली झाडे तोडत असताना झाडावरून खाली पडला व जखमी झाला. उपचारासाठी त्याला दुपारी सव्वातीनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.