कणकवलीत आजपासून बॅडमिंटन स्पर्धा
कणकवलीत
आजपासून
बॅडमिंटन स्पर्धा
कणकवली : बॅडमिंटन क्लब आणि के. एन के. स्मॅशर्सतर्फे उद्या (ता.२१) ते रविवारी (ता.२२) दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील भालचंद्र महाराज संस्थानलगतच्या नगरपंचायत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा होणार आहे.
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याहस्ते होणार या स्पर्धेचे उद्घाटन आहे. विजेत्या स्पर्धकाला २५ हजार रुपये आणि उपविजेत्या स्पर्धकाला १५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याखेरीज इतर अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी सर्व क्रीडारसिकांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कणकवली बॅडमिंटन क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

