संस्कार, शिक्षण, सामाजिक बांधिलकी बळकट करूया

संस्कार, शिक्षण, सामाजिक बांधिलकी बळकट करूया

Published on

rat२४p१.jpg-
P२६O३२९११
रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेच्या कार्यक्रमात सीए केदार करंबेळकर यांचा सत्कार करताना अध्यक्ष अनंत आगाशे.
-----
सामाजिक बांधिलकी बळकट करूया
सीए करंबेळकर ः कुवारबाव ब्राह्मणसभेचा स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेचे कार्य २३ वर्षे सुरू आहे. गुढीपाडवा स्नेहमेळाव्यात समाजसेवेचा वसा घेतलेल्या संस्था, व्यक्तींचा हृद्य सत्कार करण्यात आला. आपला समाज संस्कार, शिक्षण, सामाजिक बांधिलकी या मूल्यांनी उभा राहिला आहे. आजच्या बदलत्या काळात ही मूल्ये अधिक बळकट करण्याची गरज आहे. समाजातील ऐक्य दृढ करूया, विद्यार्थ्यांना व नव्या पिढीला योग्य दिशा देऊया, आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेऊया, असे प्रतिपादन सीए इन्स्टिट्यूटचे शाखाध्यक्ष सीए केदार करंबेळकर यांनी केले.
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मणसभेच्या नाचणे येथील यशवंत हरी गोखले संकुलात झालेल्या गुढीपाडवा स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनंत आगाशे, कार्याध्यक्ष विद्याधर देशकुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र इनामदार, तेजा मुळ्ये, कार्यवाह रवींद्र रानडे, खजिनदार विलास कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिलाभगिनींनी चैत्रागौरी पूजन केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या प्रसंगी ईशा गुर्जर, स्पृहा पोंक्षे, अनुष्का नानिवडेकर, वरद पोंक्षे, गुरुप्रसाद पटवर्धन या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार झाला. तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल सुरेखा जोशी, यशराज बोडस, मयूर देसाई, विक्रम जोशी व प्रमोद कोनकर यांना सन्मानित करण्यात आले. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना गौरवण्यात आले आहे. विवाहाला ५० वर्षे पूर्ण केलेले सभासद शरदचंद्र नातू व शुभांगी नातू, दिगंबर घैसास व वंदना घैसास, श्रीधर गणपुले व सुजाता गणपुले, वासुदेव मुसळे व वैशाली मुसळे, जयवंत करंदीकर व रोहिणी करंदीकर, दत्ताराम देवस्थळी व पद्मा देवस्थळी यांना गौरवण्यात आले. अध्यक्षीय भाषणात आगाशे यांनी सांगितले, संस्थेची वास्तू पूर्ण झाली असून संकल्पानुसार लिफ्ट, अभ्यासिका, रंगकाम अशी सर्व कामे पूर्णत्वास जात आहेत.
--
संस्थांचा सत्कार
समाजसेवा पुरस्कार विकास साखळकर यांना आणि पर्यावरणमित्र पुरस्कार ओमसाई मित्रमंडळ, गोसेवा पुरस्कार सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेला प्रदान करण्यात आला. रखमा केळकर एज्युकेशन ट्रस्टच्या सौजन्याने गोखले भवनच्या दुसऱ्या मजल्यावर कै. दत्तात्रय केळकर अभ्यासिकेचे उद्‍घाटन सीए करंबेळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com