श्री दत्तसेवक भजन मंडळाला प्रथम क्रमांक

श्री दत्तसेवक भजन मंडळाला प्रथम क्रमांक
Published on

- rat२६p३.jpg-
२६O३३३७६
दापोली ः तालुक्यातील पाडले येथील श्री दत्तसेवक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना.
----
दत्तसेवक भजन मंडळ अव्वल
दापोली सांस्कृतिक महोत्सव; गायनाने रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २६ : कोकणच्या समृद्ध वारकरी परंपरेचा सुरेल आविष्कार ठरलेल्या ‘दापोली सांस्कृतिक महोत्सव २०२६’ अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धेत पाडले येथील श्री दत्तसेवक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पारंपारिक वारकरी संप्रदायाचा वारसा जपत श्री दत्तसेवक मंडळाने नमन, रूपावली, गजर, अभंग आणि गवळणींचे अत्यंत भावपूर्ण सादरीकरण केले. सुरेल गायन आणि तालबद्ध साथसंगतीमुळे निर्माण झालेल्या भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या सादरीकरणाला दाद दिली.
मंडळाचे प्रमुख गायक बुवा जीवन गुहागरकर यांनी आपल्या दमदार आणि प्रभावी आवाजात भजन सादर करून स्पर्धेची उंची वाढवली. त्यांना सुदर्शन बुरंबाडकर (पखवाज) आणि प्रथमेश आंजर्लेकर (तबला) यांनी उत्कृष्ट साथ दिली. गायन आणि वाद्यवृंद यांचा अचूक मेळ बसल्याने हे सादरीकरण स्पर्धेत उजवे ठरले.
या उल्लेखनीय यशामुळे श्री दत्तसेवक भजन मंडळाने पाडले गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळत असून, यामुळे कोकणातील पारंपरिक लोकसंगीत आणि वारकरी संस्कृती जतन करण्यास मोठी चालना मिळत असल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली आहे.
-----
चौकट
विशेष ‘गजर’ ठरला आकर्षणाचे केंद्र
दापोली सांस्कृतिक महोत्सव हा रंगला, कृष्णामामांच्या पुण्याईने कलेचा जागर झाला।।धृ।। नमन भजन खालुबाजा, विविध कलेचा कोकण राजा. ठेवा जपला संस्कृतीचा, मराठीचा इथे गाजावाजा. रंगमंच हा तुम्ही हो दिधला, कलावंत धन्य झाला ।।१।। अशी वैशिष्ट्यपूर्ण गझल गुहागरकर यांनी सादर केली. त्यांनी कोकणची कला, संस्कृती आणि परंपरेचा गौरव केला. या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे परीक्षक आणि आयोजकांनी विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com