परशुराम घाटात मोटार उलटली एक ठार, तिघे जखमी

परशुराम घाटात मोटार उलटली एक ठार, तिघे जखमी
Published on

(टीप- नाशिक आवृत्तीलाही द्यावी.)

-rat4p12.jpg
35319
चिपळूण ः परशुराम घाटात झालेल्या अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून चिपळूणकडे नेण्यात आले.

परशुराम घाटात मोटार उलटून
नाशिकचे एक ठार, तिघे जखमी

गणपतीपुळेला जाताना ताबा सुटल्याने अपघात

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात शुक्रवारी (ता. ३) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास मोटार उलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. मदतकार्यासाठी स्थानिकांचे अनेक हात पुढे आले. त्यामुळे जखमींना उपचारासाठी वेळेत चिपळूणपर्यंत नेता आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (वय २८, रा. कांची, ता. नाशिक) हा मित्रांसह मोटारीने गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी निघाला. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन उलटली. या भीषण अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला; तर कृष्णा संपत आव्हाड (३३, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डेरिंगे (३६, रा. पळसे, नाशिक) आणि कारचालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले. जखमींवर चिपळुणातील खासगी रुग्णालयात आज सकाळपर्यंत उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांचे नातेवाईक चिपळूणमध्ये दाखल झाले आणि जखमींना ताब्यात घेऊन गावी निघून गेले. रोहित भालेकर यांचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यांचे नातेवाईक चिपळुणात दाखल झाले असून, शवविच्छेदन आणि पोलिसांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदतकेंद्र, चिपळूणचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ईर्शाद बेग आणि त्यांचे सहकारी काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासीही आपली वाहने थांबून मदतकार्यात गुंतले होते. परशुराम, वालोपे, फरशी आणि चिपळूण भागातील नागरिकांनी परशुराम घाटात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com