- पाच पुलांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी

- पाच पुलांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी
Published on

जिल्ह्यातील पाच पुलांसाठी ८४ कोटी मंजूर
ग्रामीण भागाला दिलासा; विकासाची नवी दारे खुली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : रत्नागिरी जिल्ह्यातील दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आरवली, संगमेश्वर, सप्तलिंगी, बावनदी आणि आंजणारी येथील पुलांच्या कामांना अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांसाठी ८४.५७ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. हा निधी मिळावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केलेला होता.
या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून पुलांच्या अभावामुळे पावसाळ्यात प्रचंड हाल सोसावे लागत होते. पाणी वाढल्यावर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात नेणे कठीण जात असे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यातही अनेक अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर आरवली, संगमेश्वर आणि सप्तलिंगी परिसरातील पुलांचे काम वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत मोलाचे ठरणार आहे. या सर्व प्रकल्पांना एकत्रित मंजुरी मिळाल्याने विकासाच्यादृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. ८४.५७ कोटींच्या या भरीव निधीमुळे संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातील विकासाची नवी दारे खुली झाली असून, स्थानिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
-----------------
कोट
मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास हा माझा ध्यास आहे. नागरिकांना दळणवळणासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. या पुलांच्या कामामुळे नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल.
- उदय सामंत, पालकमंत्री
----
दृष्टिक्षेपात
* अंजनारी ः गावात जाण्यासाठी पूल आणि पायाभूत सुविधांना मंजुरी.
* आरवली ः गरम पाण्याच्या कुंडांजवळ जाणारा अंडरपास आणि सेवारस्त्यास मान्यता
* बावनदी व सप्तलिंगी- स्थानिकांना जीवनदायी ठरणाऱ्या पुलांच्या कामांना वेग येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com