अंगणवाड्या सकाळच्या सत्रात भरवा

अंगणवाड्या सकाळच्या सत्रात भरवा
Published on

35753

अंगणवाड्या सकाळच्या सत्रात भरवा

अन्वेषा आचरेकर ः मालवण गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून याचा मोठा फटका लहान मुलांना बसत आहे. मालवण शहरातही सध्या कडक ऊन पडत असून या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांच्या वेळेत तातडीने बदल करावा, अशी मागणी मालवण नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा गटनेत्या अन्वेषा आचरेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले.
शहरात एकूण आठ ठिकाणी अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ३ ते ६ वयोगटातील लहान मुले शिक्षणासाठी येतात. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाही अंगणवाड्यांची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत ठेवली आहे. भर दुपारी सुटी होत असल्याने लहान मुलांना या कडाक्याच्या उन्हातून घरी जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी साधारणतः १ एप्रिलपासून अंगणवाड्यांची वेळ बदलून ती सकाळी ८.३० ते ११.३० अशी केली जाते. मात्र, यंदा एप्रिल सुरू होऊनही अद्याप वेळेत बदल का केला नाही? याबाबत प्रशासनाकडे कोणतेही ठोस उत्तर नाही. उच्च तापमान असतानाही मुलांना दुपारी २ वाजेपर्यंत अंगणवाडीत थांबविणे हे त्रासदायक आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांच्या हितासाठी वेळेत बदल करावा. वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अंगणवाड्यांची वेळ सकाळच्या सत्रात करावी, जेणेकरून मुले ऊन वाढण्यापूर्वी सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com