

राजापुरात ५१ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर
निवडणुकीचा धुरळा उडणार ; इच्छुकांची मोर्चेबांधणी
राजापूर, ता. ७ ः वर्षभरामध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतींची प्रशासनाकडून प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार असून, गावागावातील राजकारण तापणार आहे.
वर्षभरामध्ये मुदत संपत असलेल्या वा संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रभाग रचना निश्चित करण्याचा कार्यक्रम महसूल प्रशासनाकडून जाहीर केला आहे. त्यामध्ये तालुक्यातील कारवली, निवेली, पांगरीखुर्द, शिवणेखुर्द, कोंडसर बुद्रुक, गोठणेदोनिवडे, करक, चिखलगाव, राटपाटण, शिळ, पांगरेबुद्रुक, तुळसवडे, पन्हळेतर्फ सौंदळ, फुपेरे, सोलगाव, तारळ, अणसुरे, मंदरूळ, महाळुंगे, येरडव, काजिर्डा, ससाळे, पडवे, हातदे, सौंदळ, वाडापेठ, कोदवली, तळगाव, आडवली, आंबोळगड, चुनाकोळवण, दळे, जवळेथर, कशेळी, परटवली, मोसम, मोरोशी, मिळंद, गोवळ, कोंडीवळे, ताम्हाणे, वाल्ये, धोपेश्वर, ओणी, दोनिवडे, हरळ, ओशिवळे, कुंभवडे, कोळंब, कुवेशी, उन्हाळे अशा ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. इच्छुकांसह राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. त्यामध्ये सक्षम लोकनियुक्त सरपंचपदाच्या उमेदवारासह ग्रामपंचायत सदस्यपदाच्या उमेदवारांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.
--------
चौकट
दृष्टिक्षेपात कार्यक्रम
प्रारूप प्रभाग रचना जाहीर ः ७ एप्रिल, २०२६
प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत ः १३ एप्रिल, २०२६
प्राप्त हरकतींवर सुनावणी ः २१ एप्रिल, २०२६
सुनावणीचा अभिप्राय जिल्हाधिकार्यांना सादर करणे ः २३ एप्रिल, २०२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.