देवरुख गॅस टंचाईचा भडका

देवरुख गॅस टंचाईचा भडका
Published on

- rat८p५.jpg -
P26O36074
देवरूख ः गॅस एजन्सीवर धडकलेले नागरिक आणि पदाधिकारी.
----
देवरूखात गॅस वितरणाचा बोजवारा
महायुतीच्या शिष्टमंडळाची एजन्सीवर धडक; तहसीलदारांचीही घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ८ ः देवरूख शहर आणि परिसरात मागील अनेक दिवसांपासून एचपी महालक्ष्मी गॅस एजन्सीकडून सिलिंडर वितरणात होणारा प्रचंड विलंब आणि ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर दक्षिण भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगराध्यक्षा आणि महायुतीचे नगरसेवक यांनी गॅस एजन्सीवर मंगळवारी धडक देऊन व्यवस्थापनाला धारेवर धरले.
गॅस सिलिंडर बुक करून १५ ते २० दिवस उलटले तरी घरपोच वितरण केले जात नाही. इतकेच नव्हे, तर गॅस कार्यालयात भरउन्हात दोन-दोन दिवस रांगेत उभे राहून कुपन घेऊनही ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. याबाबत पदाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सीला जाब विचारला. त्यानंतर भाजप शिष्टमंडळाने तत्काळ तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली. गॅसवितरणातील अनियमितता आणि गैरकारभाराची सविस्तर माहिती देत या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अत्यावश्यक सेवेत होणारी ही ढिलाई सहन केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
या धडक मोहिमेवेळी भाजप संगमेश्वर तालुकाध्यक्ष रूपेश कदम, शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष वैभव कदम, नगरसेविका स्वाती राजवाडे, कविता नार्वेकर, श्रद्धा इंदुलकर, प्राची भुवड, नेहा आंबेकर, रूपेश भागवत, प्रफुल्ल भुवड, आनंद सारदळ आदी उपस्थित होते.
------------
कोट
गॅस सिलिंडर ही प्रत्येक घराची अत्यावश्यक गरज आहे. ग्राहकांनी पैसे भरून आणि बुक करूनही त्यांना २० दिवस सिलिंडर मिळत नसेल तर हा एजन्सीचा मोठा निष्काळजीपणा आहे. उन्हातान्हात महिलांना रांगेत उभे करणे दुर्दैवी असून, जर येत्या काही दिवसांत वितरण व्यवस्था सुरळीत झाली नाही तर भाजप जनतेसाठी यापेक्षा तीव्र आंदोलन छेडेल. आम्ही हा विषय तडीस नेल्याशिवाय थांबणार नाही.
- अभिजित शेट्ये, ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com