असुर्डे ग्रामस्थांचा ८ मे रोजी ''हंडा मोर्चा''चा इशारा

असुर्डे ग्रामस्थांचा ८ मे रोजी ''हंडा मोर्चा''चा इशारा
Published on

-rat८p८.jpg -
P26O36294
संगमेश्वर ः असुर्डे येथील बंधाऱ्यातील पाणी आटत चालले आहे.
------------
असुर्डे ग्रामस्थांवर टंचाईचे संकट
जलजीवनची कामे रखडली; ‘हंडा मोर्चा’चा इशारा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ९ ः एकीकडे सरकार ‘हर घर नलसे जल’ या योजनेतून घरोघरी पाणी देण्याची घोषणा करी आहे; मात्र संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर कामे वर्षभर रखडल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यासाठी ८ मे रोजी रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर व जिल्हा परिषदेवर ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.
असुर्डे गावातील मनवेवाडी, पाताडेवाडी, गुरववाडी, कुळ्येवाडी, लोहारवाडी या भागाला बोडकीचा बंधारा येथून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात या बंधाऱ्यात पाणी शिल्लक राहत नाही. यावर उपाय म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत पर्यायी स्रोत बळकट करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मे २०२५ मध्ये कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले; पण त्यानंतर वर्षभर हे काम बंदच आहे. त्यामुळे जुना स्रोतही बाधित झाला असून, ग्रामस्थांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.
या संदर्भात ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. विशेष म्हणजे, २६ जानेवारी २०२६ रोजी सरपंचांनी उपोषणाचा इशारा देऊनही प्रशासनाला जाग आलेली नाही. १५ दिवसांत काम सुरू झाले नाही तर ८ मे रोजी तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी पत्राद्वारे प्रशासनाला दिला आहे. हे पत्र जिल्हाधिकारी, पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि आमदार शेखर निकम यांनाही पाठवण्यात आले आहे.
-----
या आहेत प्रमुख मागण्या
गावतळीचे बांधकाम त्वरित पूर्ण करा, बोडकीचा बंधारा आणि जॅकवेलमधील गाळ काढा, जलसंधारणाची कामे करून पाणीस्रोत बळकट करा, पाणीसाठा वाढवण्यासाठी मोठा बंधारा किंवा पाझर तलाव बांधा, अशा मागण्याही निवेदनातून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.
----
कोट
आम्ही वारंवार विनंती करूनही जलजीवन मिशनचे काम ठेकेदाराने अपुरे ठेवले आहे. खोदकाम केल्यामुळे आहे तो पाण्याचा मार्गही बंद झाला आहे. २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा दिला होता, तरीही प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. आता ग्रामस्थांचा संयम सुटत आहे.
- प्रदीप शिंदे, सरपंच, असुर्डे
---
दृष्टिक्षेपात
* योजना १ कोटी ९० लाख रुपये मंजूर
* कामे अर्धवट. आतापर्यंत १ कोटी खर्च
* प्रत्यक्षात ३५ टक्के कामही पूर्ण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com