आता पर्यटन विकासाला गती

आता पर्यटन विकासाला गती
Published on

36567

आता पर्यटन विकासाला गती

आमदार केसरकर ः गेळेत कबुलायतदार जमिनींचे वाटप


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः गेळे येथील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कबुलायतदार गावकर जमिनी वाटप केल्या आहेत. या जमिनीचे वाटप करताना आनंद होत आहे. यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले असून आता चौकुळ आणि आंबोली येथील जमिनी भूमिअभिलेख मार्फत मोजून वनसंज्ञा जमिनीसह वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले.
गेळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज महास्वराज्य अभियान आणि गेळे येथे शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर जमिनी वाटप समारंभप्रसंगी आमदार केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार श्रीधर पाटील, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सरपंच सागर ढोकरे, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा परिषद सदस्या शोभा गावडे, आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, दाणोली पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी, चौकुळ सरपंच गुलाब गावडे, उपसरपंच विजय गवस आदी उपस्थित होते.
आमदार केसरकर पुढे म्हणाले, आज गेळेतील कबुलायतदार गावकर जमिनी वाटप करताना आनंद होत आहे. गेळे, आंबोली ,चौकुळ मधील वनसदृश्य जमीन देखील एकत्रित वाटप व्हावी, अशी मागणी होती. मात्र, गेळे गावातील ग्रामस्थांनी सामंजस भूमिका दाखवून कबुलायतदार गावकर जमिनी वाटप करण्यास प्राधान्य दिले आहे. चौकुळ आणि आंबोलीमध्ये भूमी अभिलेख मार्फत मोजणी व्हायची आहेत. जमीन मोजणी झाल्यानंतर वनसदृश्य जमिनी सह कबुलातदार गावकर जमीन वाटप होईल, त्यावेळी गेळेमधील देखील वनसदृश्य जमीन वाटप करण्यात येईल. प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार वनसदृश्य जमिनीचा निर्णय झालेला आहे. मात्र, त्यावर वनविभागाने अपील केलेले असल्याने तो प्रश्न रेंगाळलेला आहे, तो लवकरच सुटेल.तसेस, सिंधूरत्न योजनेतून पर्यटनासाठी बंगले मंजूर केलेले आहेत.या भागात ते बंगले करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सध्या चौकुळ व आंबोली ग्रामपंचायतला प्रकल्प दिलेले आहे. याठिकाणी दरवर्षी तीन लाख पर्यटन येतात. त्या पर्यटकांना पायाभूत सुविधा आणि पर्यटनासाठी सुविधा मिळाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. गेळेमध्ये साहसी क्रीडा स्पर्धांसाठी प्रकल्प हाती घेणार आहे. विद्युत रोषणाई, साहसी क्रीडा प्रकार करण्याचा मानस आहे. त्यामुळे नक्कीच पर्यटक वाढतील आणि या पर्यटकांसाठी गेळे, आंबोली व चौकुळ भागामध्ये रीघ लागेल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले. यावेळी विरपत्नी सिताबाई गवस (नेतर्डे) , मनोहर बंड, काशिराम गवस, महादेव नार्वेकर, अर्जुन कदम, उत्तम कदम, धोंडी कदम, महादेव पवार व अन्य शेतकऱ्यांना सातबारा वाटप करण्यात आले. त्यांचे सरपंच सागर ढोकरे व उपसरपंच विजय गवस यांनी स्वागत केले. यावेळी तातोबा गवस,मनोहर बंड, आनंद गावडे, नितीन गवस, बाळा गवस, आरती आनंद गावडे, पी डी गावडे, शशिकांत गावडे आदी उपस्थित होते.
----------
गावातील एकोपा कायमच ठेवावा
कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न निकाली लागण्यासाठी माझ्या सह पालकमंत्री नितेश राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण अशा सर्वांचे सहकार्य लागले लाभलेले आहे. खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसा दिवशी जमिन वाटप होत असल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे. याशिवाय जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांनी देखील प्रयत्न केलेले आहेत. चौकुळ, आंबोली व गेळे गावातील वन सदृश्य जमीन प्रश्न सुटेपर्यंत लढा सुरू राहणार आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. तर, शक्तीपीठ मार्ग देखील येथून जाणार आहे. त्याचा फायदा देखील होईल. गेळे गावातील एकोपा लोकांनी कायमच ठेवावा, तो गेळे गावातील सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा आहे.
---
२३० जणांना हक्काचा सातबारा
स्वातंत्र्यानंतरही गेली कित्येक वर्ष रखडलेला गेळे येथील कबुलायतदार गांवकार जमीनप्रश्न निकाली निघाला असून जवळपास २३० जणांना हक्काचा सातबारा मिळाला आहे. जवळपास २८८ हेक्टर क्षेत्रात २३० हून अधिक खातेदार आहेत. या सर्वांना आता हक्काचा सातबारा मिळाला आहे. ५५ गुंठे जागेत शेतीसाठी ५० गुंठे, पर्यटन विकासासाठी ५ गुंठे जागेच वितरण करण्यात आले आहे‌.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com