लोकसहभागातून कदम कुटुंबियांना मिळणार हक्काचे घर

लोकसहभागातून कदम कुटुंबियांना मिळणार हक्काचे घर
Published on

26O43578 एआय चित्र

लोकसहभागातून कदम कुटुंबीयांना मिळणार हक्काचे घर
देवरूखमध्ये माणुसकीचे दर्शन ; दानशूर व्यक्तींनीही केली मदत
सकाळ वृत्तसेवा
देवरुख, ता. १५ ः देवरुख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील प्रभाकर कदम या एका गरजू कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न आता समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने साकार होणार आहे. गुरुवारी (ता. १४) या घरकुल उभारणीस सुरुवात झाली.
प्रभाकर कदम यांचे कुटुंब अत्यंत पडक्या आणि दुरवस्था झालेल्या घरात वास्तव्यास होते. ही बाब देवरूखचे नगरसेवक रूपेश भागवत यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने शासकीय योजनेतून घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले; मात्र काही तांत्रिक व कायदेशीर अडचणींमुळे त्यांना शासकीय मदत मिळण्यात अडथळे आले. अशा स्थितीत हताश न होता, रूपेश भागवत यांनी आपले ज्येष्ठ बंधू आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांच्याशी चर्चा केली. दोन्ही भागवत बंधूंनी केवळ स्वतः मदतीचा हात पुढे केला नाही, तर समाजातील दानशूर व्यक्तींनाही या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. भागवत बंधूंच्या या हाकेला देवरूखमधील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाइकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, डॉ. आंबेडकर नगरमधील स्थानिक रहिवाशांनीही या कामासाठी मोलाची मदत केली आहे. १४ मे रोजी सदानंद भागवत, रूपेश भागवत आणि मदतीचा हात देणाऱ्या अन्य नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून घराच्या कामाला सुरुवात झाली. देवरूखमध्ये अशा प्रकारे लोकसहभागातून एखाद्या कुटुंबाला संपूर्ण घर बांधून देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
----
कोट
शासकीय नियमांच्या चौकटीत बसत नसल्याने कदम कुटुंबीयांची गैरसोय होत होती. मात्र, समाज म्हणून आपण त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, या भावनेतून आम्ही पुढाकार घेतला. नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच हे शक्य झाले आहे.
- सदानंद भागवत, अध्यक्ष, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com